Mumbai News Saam Tv
Video

Dadar Kabutarkhana : ‘आम्हीही मुंबईकर असून...’, कबुतरखान्याच्या बंदीदरम्यान 'पेटा'ची जाहिरात चर्चेत

Mumbai Dadar News : मुंबईतील कबुतरखान्यांवरून वाद चिघळला असून, आरोग्यतज्ज्ञ आणि नागरिकांनी बंदीची मागणी केली आहे. मात्र ‘पेटा’ आणि प्राणीप्रेमी संघटना कबुतरांच्या समर्थनार्थ उघडपणे पुढे सरसावल्या आहेत. न्यायालयाने खाद्यबंदी कायम ठेवली आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत कबुतरखान्यांवरून आरोग्य व प्राणीप्रेमींमध्ये वाद तीव्र

  • ‘पेटा’ने “आम्हीही मुंबईकर” अशी जाहिरात लावून कबुतरांच्या समर्थनार्थ मोहिम केली

  • उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यावरील बंदी कायम ठेवली

  • नागरिक-आरोग्यतज्ज्ञ आणि प्राणीप्रेमी यांच्यात संघर्ष सुरूच

मुंबईतील कबुतरखान्यांवरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एका बाजूला मानवी आरोग्यावर कबुतरांच्या विष्ठेमुळे गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे सांगून कबुतरखाने बंद करण्याची मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्राणीप्रेमी आणि जैन समाज यांचा कबुतरांच्या समर्थनार्थ ठाम आक्रोश सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्राणी आणि पक्ष्यांच्या हक्कांसाठी लढणारी ‘पेटा’ (PETA) ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था उघडपणे कबुतरांच्या बाजूने मैदानात उतरली आहे.‘पेटा’ने नुकतीच मंत्रालयाजवळील के. सी. महाविद्यालयाजवळील बेस्ट उपक्रमाच्या बस स्थानकावर एक जाहिरात झळकवली आहे. “आम्हीही मुंबईकर असून आमचा आदर करा” असा या जाहिरातीचा आशय आहे. कबुतरांना ‘मुंबईकर’ ठरवत त्यांच्या हक्कासाठी केलेल्या या आगळ्यावेगळ्या जाहिरात मोहिमेने मोठी चर्चा निर्माण केली आहे.

याआधी दादरमधील कबुतरखान्याजवळही अशाच स्वरूपाची जाहिरात लावण्यात आली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तीव्र आक्षेपानंतर ही जाहिरात दुसऱ्याच दिवशी हटविण्यात आली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणारे आजार, ऍलर्जी आणि श्वसनाचे त्रास याकडे डॉक्टरांकडून वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. याच कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर न्यायालयाने बंदी कायम ठेवली असून, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील मुंबईतील अनेक ठिकाणी कबुतरांना गुपचूप खाद्य दिले जात असल्याचे प्रकार सुरूच आहेत.

दरम्यान, कबुतरांना खाद्य देण्यावरील बंदीबाबत काही पक्षीप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिकेचा निर्णय कायम ठेवत कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यावर बंदीचा आदेश अबाधित ठेवला.या सगळ्या घडामोडींमध्ये ‘पेटा’ने उचललेले पाऊल चर्चेचा विषय ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT