ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थंडीच्या दिवसांत केस कोरडे होतात, मुळं कमकुवत होतात आणि गळती वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात आठवड्यातून २ वेळा गरम नारळ तेलाने डोक्याचा मसाज करा. रक्तप्रवाह वाढतो आणि केस मजबूत होतात.
लिंबाच्या रसात कोरफड जेल मिक्स करा आणि मुळांवर लावा. कोंडा कमी होतो आणि केस गळणे थांबते.
मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरला वाटून दह्यात मिक्स करा. तयार केलेले मिश्रण हेअर पॅक म्हणून लावा. याने केसांना नैसर्गिक प्रोटिन मिळेल.
जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेली पेस्ट केसांच्या मुळांना पोषण देते आणि गळती कमी करते.
अक्रोड, जवस, मच्छी, आणि बदाम खा. हे केसांच्या मुळांना आतून पोषण देतात.
गरम पाणी केसांचे नैसर्गिक तेलं काढून टाकते म्हणून कोमट पाण्याने केस धुवावे.