ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात थंडी वाढली की त्वचा कोरडी, खडबडीत आणि निस्तेज दिसू लागते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
दररोज अंघोळीनंतर लगेच मॉइस्चरायझर लावा. त्वचेचा ओलावा टिकूनराहण्यासाठी मॉइस्चरायझर महत्वाचं असते.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी पडते. त्यामुळे दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यावे.
खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेलं निघून जाते म्हणून कोमट पाण्याचा वापर करावा.
हनी आणि अॅलोवेरा जेल मिसळून आठवड्यातून दोनदा लावा. त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ग्लो वाढतो.
बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल, आणि ऍव्होकॅडो यांचा आहारात समावेश करा . हे त्वचेला आतून मॉइस्चर देतात.
हिवाळ्यातही सूर्यकिरण त्वचेला हानी पोहोचवतात म्हणून दररोज SPF असलेला सनस्क्रीन वापरा.
रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर रात्रभर त्वचा मुलायम राहण्याकरिता हलकेसे नाईट क्रीम लावा.