ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हालासुध्दा पिंपल्सच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असेल तर हा फेसपॅक तुम्ही वापरु शकता.
सर्वप्रथम, एका भांड्यात अर्धा चमचा हळद आणि २ चमचे कडुलिंब पावडर घ्या.
आता एका भांड्यात थोडे मध घालून सर्व गोष्टी मिक्स करा.
ही गुळगुळीत पेस्ट तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा.
चांगले परिणाम मिळविण्यासाठी, तुम्हाला हा फेस पॅक १० मिनिटे लावावा लागेल.
साध्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम जाणवू लागतील.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेला हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून १-२ वेळा वापरू शकता.
हा फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करायला विसरू नये.