Crop Damage in Rain in satara saam tv
Video

Maharashtra rain farmer crisis : शेतकऱ्याचं दुःख डोंगराएवढं! २ एकराची केळीची बाग, पावसानं केली भुईसपाट | VIDEO

Crop Damage in Rain : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय. साताऱ्यातल्या फलटणमधील शेतकऱ्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या २ एकरातील केळीची बाग भुईसपाट झालीय.

Nandkumar Joshi

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. केळी उत्पादकांना मोठा फटका बसला आहे प्रशासनानं तत्काळ पंचनामे करुन मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करताहेत. माझी दोन एकराची केळीची बाग पाच दिवसाच्या पावसामुळं संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. अंदाजे सहा लाख रुपये खर्च आला आहे. निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो. आजच्या घडीला माझे १२ ते १५ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. याची सरकारनं कुठंतरी दखल घ्यावी, अशी विनंती शेतकऱ्यानं केली आहे.

दुसरीकडं पावसाने राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान केलंय. जालन्यात राणी उचेगाव शिवारात कोबी शेतातच खराब होत असल्यानं लाखोंचं नुकसान झालंय. तर बीडच्या येळंब घाटात काकडी पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. धुळे जिल्ह्यात शेतात साठवून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णत: भिजलाय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमूग शेतीचं मोठं नुकसान झालंय. पाणी शेतात घुसल्यानं शेंगदाणा वाया गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT