Crocodile spotted near Babaso Maskar's house in Dhamwade village, Sangli – later rescued by locals and forest officials. saam tv
Video

Sangli News: गावात अचानक आली भलीमोठी मगर, पाहून सगळेच घाबरले; गावकऱ्यांची पळापळ, पाहा VIDEO

Crocodile Spotted On Road: शिराळा तालुक्यातील धामवडे गावात रस्त्यावर मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या भागात नदी नसताना मगर कुठून आली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील धामवडे येथील वाहनधारकांना रस्त्यावर मगरीचे दर्शन झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मगरीला प्राणी मित्राने व ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. परंतु या भागात नदी नाही तरीही मगर आली कुठून? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. कोंडाईवाडीचे ग्रामस्थ विश्वास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील हे शिराळाहून शिरसी मार्गे कोंडाजी वाडीकडे येताना त्यांना शिरसी धामवडे या रस्त्यावर बाबासो मस्कर यांच्या घराजवळ ही मगर आढळून आली.

यानंतर त्यांनी ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली. धामवडे व परिसरात गेली अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री या रस्त्यावरती शुकशुकाट असतो. धामवडे हे गाव डोंगराच्या कपारीत वसलेले गाव आहे. या ठिकाणी नदी नाही. तरीही या भागात मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT