CONGRESS TO OBSERVE ‘BLACK DAY’ NATIONWIDE OVER RAHUL GANDHI PROTEST INCIDENT 
Video

काँग्रेस उद्या देशभरात 'काळा दिवस' पाळणार, इंडिया आघाडीचं दिल्लीत उद्या पुन्हा आंदोलन?

Congress Calls for Nationwide ‘Black Day : राहुल गांधी यांच्याशी झालेल्या कथित धक्काबुक्की आणि आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसकडून देशभर ‘काळा दिवस’ पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलनाचे आदेश देण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

काँग्रेस उद्या लोकशाहीसाठीचा काळा दिवस पाळणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की आणि आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभर निदर्शनं करण्याचं आवाहन काँग्रेस मार्फत करण्यात आलंय.

राज्य आणि जिल्हा काँग्रेस कमिटीने ज्ञानेश कुमार यांना हटवलं जात नाही तोपर्यंत शांततापूर्ण आंदोलन करावे, असे काँग्रेस हायकमांडने कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेत्यावर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला आहे याचा निषेध म्हणून काळा दिवस पाळावा असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिलेत. याबाबत काँग्रेसनं एक परिपत्रक जाहीर करत काँग्रेसच्या सर्व कार्यालयात पाठवण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते आणि जनतेच्या लोकप्रतिनिधींवर झालेला हल्ला हा थेट संविधानावरच झालेला हल्ला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय लोकशाहीसाठी आजचा दिवस 'काळा दिवस' (Black Day) म्हणून जाहीर करत आहे. याद्वारे सर्व प्रदेश काँग्रेस समित्या (PCCs), जिल्हा काँग्रेस समित्या (DCCs) आणि ब्लॉक काँग्रेस समित्या (BCCs) यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी उद्या, गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक/मंडल स्तरावर मोठ्या प्रमाणावर निदर्शने आयोजित करावीत," असे काँग्रेसचे सरचिटणीस (संघटना) के. सी. वेणुगोपाल यांनी सर्व पीसीसी (PCC) अध्यक्ष, डीसीसी/सीसीसी/बीसीसी (DCC/CCC/BCC) अध्यक्ष, एआयसीसी (AICC) सरचिटणीस/प्रभारी, सीएलपी (CLP) नेते, विविध आघाड्या (Frontal Organisations), विभाग आणि कक्षांचे राष्ट्रीय प्रमुख तसेच एआयसीसी (AICC) सचिव/सह-सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

भाजपनं ८० च्या दशकातील अभिनेत्याला दिली महत्त्वाची जबाबदारी; सुपरस्टारला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

वय वाढलं की राजकारणी वेड्यासारखं करतात; इंदुरीकर महाराजांच्या विधानानं वाद

MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; आंदोलन सोडा, अभ्यासावर लक्ष द्या

Mangalsutra Buying Tips : पितृपक्षात नवीन मंगळसूत्र खरेदी करावे की नाही? महिलांसाठी महत्वाचे नियम

SCROLL FOR NEXT