Shivsena congress Alliance in kolhapur elections saam tv
Video

Muncipal Elections : 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!'...काँग्रेस-शिवसेना आघाडी झाली रं...

congress shiv sena alliance kolhapur municipal elections : मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असली तरी, कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रितपणे महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काँग्रेस-शिवसेना आघाडीची घोषणा केली.

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर, साम टीव्ही

मुंबईत महाविकास आघाडी फुटली आहे. ठाकरेंच्या सोबत आघाडी न करता काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे. पण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित लढणार आहेत. महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना आघाडी झाल्याची घोषणा स्वतः सतेज पाटील यांनी आज, बुधवारी केली.

महापालिकांच्या निवडणुकांचं रण तापलं असून, प्रमुख पक्षांमध्ये युती-आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. आज मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युतीची घोषणा झाली आहे. स्वतः राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुंबईत काँग्रेसनं मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. एकला चलो रे असं म्हणत काँग्रेस निवडणुकांना सामोरे जाणार आहे. तर दुसरीकडं काँग्रेसनं कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही पक्षांची आघाडी झाली आहे. याबाबत सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शिवसेना आणि काँग्रेस आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. आम आदमी पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट नाही. मी कुणालाही कमी लेखणार नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या सर्व घटकपक्षांची आम्हाला गरज आहे. पुढील सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला या पक्षांची महाविकास आघाडी म्हणून गरज लागणार आहे, असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले सतेज पाटील ?

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा केली आहे. त्यांना काही जागांचा प्रस्ताव दिला आहे. अजून चर्चा सुरू आहे. आम आदमी पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी परिस्थिती आहे. उर्वरित घटकपक्ष आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाठीचार्जविरोधात ठाकरे बंधू मैदानात; मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

Maharashtra Bandh: वंचित आघाडीचा महाराष्ट्र बंद; विद्यार्थ्यांसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

SCROLL FOR NEXT