Congress Andolan SaamTv
Video

Congress Protest : मंत्रालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत कॉंग्रेसचं आंदोलन; मुंबईत कार्यकर्ते पुन्हा आक्रमक

Mumbai Mantralaya News : भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज पुन्हा एकदा कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले आहेत. अमित शाह यांनी माफी मागावी म्हणून कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यक्तव्यावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. काल भाजपकडून मुंबईतील कॉंग्रेसच्या कार्यालयावर तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर आता आज पुन्हा एकदा कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी कॉंग्रेसच्या आंदोलकांकडून 'जय भीम'च्या घोषणा देखील देण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे आंदोलन करण्यात येत असून काल झालेला हल्ला हा अमित शाह यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, यावेळी आंदोलक आणि पोलिसांत धरपकड झालेली बघायला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे.

संसदेत अमित शाह यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यानंतर आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या या गदारोळाचे पडसाद राज्यात देखील पाहायला मिळाले. काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात अचानक घुसून काँग्रेस कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी देखील झालेली बघायला मिळाली होती.

आता त्याच अनुषंगाने आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत 'जय भीम'च्या घोषणा आंदोलक कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत. तर काल झालेला हल्ला हा गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे. आंदोलन सुरू असताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झालेली बघायला मिळाली असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Jio Recharge: Jioचा स्पेशल रिचार्ज प्लान, 448 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता

Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा फक्त ९ तासात पोहोचणार; १३ जिल्ह्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग; सिंधुदुर्गातील या गावांचा समावेश

Rakesh Bedi: धुरंधरमुळे आयुष्य पालटलं, 'या' अभिनेत्याला मिळणार डबल मानधन; कारण काय?

Sweaty hands: हातांना सतत घाम येतोय? दुर्लक्ष नको, वाचा तुमचं शरीर तुम्हाला काय संकेत देतंय

SCROLL FOR NEXT