Dharavi News saamtv
Video

Varsha Gaikwad : नारळ फोडताना एवढं घाबरण्याचे कारण काय ? वर्षा गायकवाड भडकल्या

Dharavi Redevelopment Project : माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी गुपचुप करण्यात आले. या भूमिपूजनावरुन आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे.

Saam Tv

माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन गुरुवारी करण्यात आले. या भूमिपूजनावरुन आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे. विरोधाला घाबरुन अदानींकडून गुपचूप भूमिपूजन केल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडीने या प्रकल्पाला जाहीर विरोध केला आहे. अदानी समूहाकडे या पुनर्विकास प्रकल्पाचे काम देण्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिला आहे. असं असतानाही धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा उरकण्यात आला.

या भूमिपूजन सोहळ्यावरुन धारावीच्या माजी आमदार आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचे काम घाईघाईने आणि छुप्या पद्धतीने झालं. कोट्यवधि रुपयांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडताना एवढं घाबरण्याचे कारण काय होतं? यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून यांच्याकडून जमिनी घेण्याचे काम चालू आहे त्याच्याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. म्हणून घाबरुन त्यांनी भूमिपूजन केलं. आमचा त्याला विरोध आहे. लोकांना बरोबर न घेता कुठला विकास होऊ शकतो का?," असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT