Priyanka Gandhi News SaamTv
Video

Priyanka Gandhi News : लोकसभेत खासदार प्रियंका गांधींचं पहिलं भाषण | VIDEO

MP Priyanka Gandhi First Speech In Parliament : कॉंग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी जात जनगणनेसह अनेक मुद्यांवर भाष्य केलं.

Saam Tv

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज संविधानावरील चर्चेत लोकसभेत पहिले भाषण केलं. 2017 च्या उन्नाव बलात्कार प्रकरणापासून आणि गेल्या महिन्यात संभलमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारासारख्या अनेक मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आज देशातील जनता जात जनगणना करण्याची मागणी करत आहे. सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्यांनी याचा उल्लेख केला, लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळेच याचा उल्लेख केला जात आहे. प्रत्येकाची परिस्थिती जाणून घेऊन त्यानुसार धोरणे बनवता यावीत यासाठी जात जनगणना आवश्यक आहे. आपली राज्यघटना ही एक संरक्षक कवच आहे, जी देशवासीयांना सुरक्षित ठेवते. ती न्यायाची ढाल आहे. ते एकतेचे ढाल आहे. ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ढाल आहे. खेदाची गोष्ट म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी पक्षातील माझ्या सहकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षात हे संरक्षण कवच तोडण्याचा प्रयत्न केला, असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT