Opposition reacts to suspension of Nana Patole Saam tv news
Video

Nana Patole: '२०१४ पूर्वी लोणीकर उघडे फिरायचे, फक्त २ बायका होत्या'; नाना पटोलेंची जीभ घसरली

Nana Patole Slams Govt in Assembly: नाना पटोले यांना शेतकऱ्यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून विधानसभेतून दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत निषेध व्यक्त केला.

Bhagyashree Kamble

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरूये. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांचं आक्रमक रूप सभागृहात पाहायला मिळालं. 'लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान राज्यातील शेतकरी सहन करणार नाही. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. हे अजिबात चालणार नाही', असं नाना पटोले म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले.

यानंतर राहूल नार्वेकरांनी दिवसभरासाठी नाना पटोले यांना निलंबित केलं. विरोधकांनी याचा निषेध केला. निलंबनानंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक प्रतिक्रिया दिली. तसेच बबन लोणीकरांवर प्रहार केला. 'आज शेतकरी दिवस आहे. या दिवसाच्या त्यांना शुभेच्छा. महायुतीचं सरकार म्हणजे माज आलेलं सरकार. या सरकारची वास्तविकता पुढे आलेली आहे. यांचे आमदार आणि कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकारी समजतात. शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे सरकार घेऊन देतं. अंतवस्त्रापासून, चप्पलापासून सगळं काही सरकार देतं. २०१४ सालापूर्वी लोणीकर उघडे फिरत होते. फक्त २ बायका होत्या, असं सध्या चित्र दिसतंय, असं नाना पटोले म्हणाले.

'जो शेतकऱ्यांसाठी बोलेल त्याला निलंबित आणि जे अपमाम करतात त्यांना सन्मानाने बसवतात', अशी टीकाही यावेळी नाना पटोले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: नांदेड शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

SCROLL FOR NEXT