Abhijeet Dipke  Saam TV
Video

Cockroach Janta Party: 'माझ्यावर हल्ला करणारे RSSचे लोक', अभिजीत दीपकेंचा आरोप

Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जयपूरमधील हल्ल्यामागे RSS कार्यकर्त्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दीपके नागपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते,त्यावेळी हा आरोप केला आहे.

Bharat Jadhav

कॉकरोच जनता पार्टी नागपूरमध्ये आंदोलन करणार असून त्यापूर्वी आयोजित एका पत्रकार परिषदेत अभिजीत दीपके यांनी आरएसएसवर गंभीर आरोप केलाय. जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला करणारे आरएसएसचे लोक होते, असा आरोप त्यांनी केला आहे. जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना दीपके यांनी हा आरोप केला आहे. दिल्ली,पुणे, आणि जयपूरनंतर आसीजेपी नागपूरमध्ये आंदोलन करणार आहे. त्यानंतर २० जूनला पुन्हा दिल्लीत मोठं आंदोलन केलं जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही असा निर्धार अभिजीत दीपके यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अनेक परीक्षा झाल्या, त्यातील अनेक परीक्षेतील पेपर लीक झालेत. पंतप्रधान मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती दीपके यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केली. दरम्यान नीटच्या फेर परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने टेलिग्रामवर तात्पुर्ती बंदी घातली आहे. त्यावरून प्रतिक्रिया देताना दीपके यांनी सरकारला सवाल केला आहे. टेलिग्राममुळे काय फरक पडणार? पाच विद्यार्थी आत्महत्या करतात आणि अधिकाऱ्याची फक्त बदली होते.

मग विद्यार्थ्यांची इतकीच किंमत आहे का? असा सवाल दीपके यांनी केला आहे. दरम्यान आपल्यावर झालेला हल्ला हा बेरोजगारीमुळे झाला आहे. हल्ला करणाऱ्याकडे नोकरी असती तर त्याने माझ्यावर हल्ला केला नसता. जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी अभिजीत दीपके आरएसएस विचारधारेचे आहेत, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना दीपके यांनी थेट आरएसएसवर आरोप केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon trekking: पहिल्यांदा ट्रेकिंगला जात असाल तर हे ५ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजप नेत्याचा मृतदेह; खासदाराच्या जवळच्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Maharashtra News Live Update: तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

ठाकरे गटानंतर आणखी एक पक्ष फुटणार? हळूहळू सगळा पक्ष संपून जाणार; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Vande Bharat: आता तिकीट कन्फर्म! पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल; रेल्वे प्रशासनाचा काय आहे प्लॅन? वाचा

SCROLL FOR NEXT