Eknath Shinde News SaamTv
Video

MNS - Shinde Group : मनसे - शिंदेसेना संघर्षाचं कारण आलं समोर, एकनाथ शिंदेंनी केला गौप्यस्पोट | VIDEO

Eknath Shinde News : विधानसभेला मनसे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात संघर्ष झाल्याचं बघायला मिळत आहे. मात्र त्या मागचं नेमकं कारण काय याबद्दल आज एकनाथ शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Saam Tv

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांना विधानसभेसाठी भांडुपची जागा देऊ केली होती, मात्र मनसेने त्यांना थेट माहीम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा गौप्यस्पोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर सदा सरवणकर यांना राज ठाकरेंना भेटायला सांगितलं होतं, पण त्यांनी भेट नाकारली, याकडेही एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधलं आहे. माहीमच्या जागेवर गौप्यस्पोट करत एकनाथ शिंदे यांनी शिंदेसेना-मनसेचा नेमका वाद का आहे, यावर उत्तर दिलं आहे.

दादर माहीम विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या चांगलच राजकारण बघायला मिळत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरे आणि मानसेसओबत असलेल्या वादावर गौप्यस्पोट केल्याने आता चर्चा रंगल्या आहेत. 'आम्ही अमित ठाकरेंना भांडुपची जागा देऊ केली होती, मात्र मनसेकडून त्याबद्दल आम्हाला कोणताच प्रतिसाद आला नाही. अमित ठाकरेंची माहीम मधून थेट उमेदवारी जाहीर केली. माहीम मतदारसंघात तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा अमित ठाकरे यांना होणार असल्याचा दावा सरवणकर यांनी केला. त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेण्यास सदा सरवणकर यांना सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे भेटले नाही, असा मोठा खुलासा शिंदे यांनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT