pune news  saam tv
Video

Pune Rain: दुष्काळी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, भयंकर रौद्रावतार, VIDEO

Heavy Rains Cause Flash Floods in Shirur: पुणे जिल्ह्यात काल दुपारनंतर अचानक पाऊस सुरू झाला होता, हा पाऊस अजूनही सुरूच आहे. तसेच नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखणाऱ्या शिरूर तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

Omkar Sonawane

पुणे: संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले असून पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. यंदा मान्सून हा लवकर आल्याने दोन दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे.

शिरुर तालुक्यातील पाबळ परिसरात आज दुपारी अचानकपणे ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावली. सतत काही तास जोरदार पाऊस कोसळल्याने ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. परिणामी परिसरातील बहुतांश शेती पाण्याखाली गेली असून, शेतजमिनीत नद्यांसारखा प्रवाह निर्माण झाला आहे.

नेहमी दुष्काळाच्या छायेत असलेला पाबळ भाग अचानक जलमय झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी अचंबित झाले आहेत. मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अनेक ठिकाणी कांदा, भाजीपाला आणि इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT