Ajit Pawar Vs Eknath Shinde Saam Tv
Video

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ बैठकीत वादाचे फटाके, CM शिंदे अन् अजितदादांमध्ये जुंपली? पाहा VIDEO

Clashes In Cabinet Meeting : गुरुवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद होऊन चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली आहे. यानंतर अजित पवार हे बैठक सोडून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरू आहे. मात्र असं असताना गुरुवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की अजित पवार हे बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात उठून निघून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही महत्वाकांक्षी प्रस्तावाला मंजूरी न दिल्याने हा वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातच वाद झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील नेत्यांमध्ये असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एका महत्त्वाच्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याने त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या दहा मिनिटातच काढता पाय घेतला. त्यापुढे ही बैठक तब्बल दोन ते अडीच तास चालली.

दरम्यान, आता या वादावर विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. सरकार कॅबिनेटमध्ये जनतेसाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी वाद घालतं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर महायुतीत कधीच काही आलबेल नव्हतं असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उर्वरित नगरपरिषद नगरपंचायतीसाठी आज मतदान

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

SCROLL FOR NEXT