Police personnel deployed at Matoshree Nagar in Ambernath after clashes erupted between BJP and Shinde Sena workers during voting. Saam Tv
Video

मतदानावेळी गोंधळ; शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Ambernath Municipal Election Tension: अंबरनाथमधील मातोश्री नगर परिसरात मतदानावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

Omkar Sonawane

अंबरनाथ शहरातील मातोश्री नगर परिसरात आज मतदानाच्यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेवर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परिसरात एकत्र आल्याने मोठा राडा झाला होता.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आज राज्यातील उर्वरित नगरपालिकांचे मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी शिंदे गट आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढत असून अंबरनाथमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासूनच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खायला दिली नाही, गिऱ्हाइकाची सटकली; पाणीपुरीवाल्यासोबत भयंकर घडलं

Accident: अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

संध्याकाळी चुकूनही या 5 गोष्टी करू नका, आरोग्य बिघडेल

SCROLL FOR NEXT