dhule news  Saam tv
Video

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

Dhule Politics :भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडल्याचा प्रकार घडला. यावेळी एकाने केलेल्या गोळीबारात एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.

Vishal Gangurde

राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. धुळे महानगरपालिकेतही दोन गटात राडा झाला. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या दोन गटांमध्ये एकमेकांवर झालेल्या हल्ल्यादरम्यान बंदुकीतून गोळीबार झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत.

बंदुकीतून झालेल्या गोळीबारानंतर जखमीच्या पोटात अद्यापही फायर झालेली गोळी तशीच आहे. ऑपरेशन करून गोळी बाहेर काढण्याची डॉक्टरांतर्फे प्रक्रिया सुरू आहे. या हल्ल्याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आहेत. आठ आरोपींविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तर त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली. तर एका आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

एक व्हिडीओ, उमेदवारी गेली, भाजपकडून ट्रोल, माघारीनंतर रडारड

SCROLL FOR NEXT