CJP STRATEGY MEETING AFTER JANTAR MANTAR PROTEST | ABHIJIT DIPKE ON POLITICAL ENTRY Saam Tv
Video

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

CJP Founder Abhijeet Dipke News : दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP च्या कोअर कमिटीची संभाजीनगरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. अभिजित दिपके यांनी राजकारणात उतरण्याबाबत भूमिका स्पष्ट करत CJP सरकारविरोधात पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून कार्य करणार असल्याचे सांगितले.

Alisha Khedekar

दिल्लीतील जंतर मंतरवर यशस्वीरीत्या पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर CJP जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. एका तरुणाने विद्यार्थ्यांचा आवाज बनून उचलेल पाऊल देशाच्या राजकारणात सुद्धा वादळ आणेल याची कोणालाही कल्पना नव्हती. दरम्यान आता हेच वादळ राजकारणात उतरणार का? याबाबत चर्चा सुरु आहेत. CJP चे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या कोअर कमिटीची आज संभाजीनगरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या आंदोलनाची पुढील रणनीती आणि CJP ची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी ही बैठक दीपके यांच्या घरी आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी सौरभ दास यांच्यासह CJPचे प्रमुख सहकारी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. या बैठकीत आंदोलनाची आगामी भूमिका, संघटनेची ध्येय-धोरणे आणि पुढील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीपूर्वी दिपके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणात उतरण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिपके मी म्हणाले, CJP ही सरकारविरोधात पब्लिक प्रेशर ग्रुप म्हणून काम करेल. दरम्यान, स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर दीपके यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच हा पर्याय त्यांनी स्पष्टपणे नाकारलेलाही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT