दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांना जामीन मंजूर केलाय. 'तिरंगा मार्च'च्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी त्यांना काल ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर अटक करण्यात आली होती. आज त्यांना दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना काही अटीशर्तींसह जामीन दिलाय.
नेहा बोरा यांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय. सरकारकडू कायदा सुव्यवस्थेचं धिंडवडे उडवले जात असल्याची टीका नेहा बोरा यांनी तुरुंगाबाहेर येताच केली होती. सामान्य नागरिकांशी अशाप्रकारे वागले जाते जणू ते मोठे गुन्हेगारच आहेत, ही प्रथा या देशात दीर्घकाळापासून सुरू असल्याची टीकाही नेहा बोरा यांनी केली होती. दरम्यान दुसरीकडे सीजेपीचे इतर दोन कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अजून जामीन मिळाला नाहीये. दीपके यांना दिल्लीमधील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी कोर्टाबाहेर कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
सीजेपीने सौरव दास आणि आशुतोष रांका अटकेच्या निषेधार्थ तिरंगा लहरा दो या मोर्चाचे आयोजन केले होते. दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलीय. पोलिसांनी नागरिकांना या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केलंय. जंतरमंतर येथे मोर्चा सुरू असताना सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.