खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबियांना शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. सीआयएसएफच्या 10 ते 15 जवानांकडून त्यांना ही मारहाण करण्यात आली असल्याचं समजत आहे.
सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक डावीकडे बस वळवल्याचा जाब विचारल्याने परब कुटुंबियांना 10 ते 15 जवानांकडून ही मारहाण करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहनामधील इतरांनाही यावेळी जवानांनी मारहाण केली. परब कुटुंबियांना करण्यात आलेल्या मारहाणी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.