beed crime  saam tv
Video

Walmik Karad: वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स कोर्टात सादर|VIDEO

Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या विरोधात महत्वाचे आरोप सीआयडीच्या हाती लागले आहे.

Omkar Sonawane

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि त्यांच्या गॅंगविरोधात सीआयडीने आणखी एक ठोस पाऊल उचलले असून, महत्त्वाचे पुरावे बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सादर केले आहेत.

विश्‍वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसरी सुनावणी उद्या बीड न्यायालयात पार पडणार आहे. त्याआधी सीआयडीने काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, डिजिटल व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि जप्त मुद्देमाल न्यायालयाकडे सादर केला आहे. विशेष म्हणजे तपासादरम्यान नव्याने हाती आलेल्या माहितीच्या आधारे हे पुरावे सादर करण्यात आले आहेत.

सीआयडीने यापूर्वी १४०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. मात्र, तपास अधिक खोलात गेल्यानंतर नव्या बाबी समोर आल्याने आरोपींच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि त्यांच्या गॅंगविरोधात सबळ पुरावे सादर केल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: विमान प्रवासात महिलेवर बलात्कार, भारतीय नागरिकाला अटक

Maharashtra News Live Update: मोबाईल चोरीला विरोध; तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला नाही

महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा उलटफेर; 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

MHADA House: मोठी बातमी! २३० स्क्वेअर फुटाची घरे असणाऱ्यांना १६०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा सर्वात मोठा प्रकल्प कुठे? कोणकोणत्या सुविधा?

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

SCROLL FOR NEXT