Accident Video Saam Tv
Video

Accident Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ड्रंक अॅंड ड्राईव्ह'चा थरार, मद्यधुंद तरूणांनी कारला उडवलं

Chhatrapati Sambhajinagar Drunk And Drive : छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अॅंड ड्राईव्हची घटना समोर आलीय. दोन मद्यधुंद तरूणांच्या गाडीने उडवल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन मद्यधुंद तरूणांच्या गाडीने कारला उडवलं. या कारमध्ये असलेल्या चारजणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ही ड्रंक अॅंड ड्राईव्हची घटना अहदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरात घडलेली आहे. या भीषण अपघातामध्ये आजी, आईसह दीड महिन्याचा चिमुकला आणि सात वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय.

संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या अहदनगर रोडवरील टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणारे दोन तरूण दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले होते. अमरावती येथील अजय देसरकर यांचे हे कुटुंब होतं. मृणाली अजय देसरकर , आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर आणि दुर्गा गीते अशी मृतांची ओळख पटलीय. तर अपघातात अजय देसरकर गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरूणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT