Religious banner controversy in Maharashtra Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये वातावरण तापले आहे. शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात “आय लव मोहम्मद” असे बॅनर लावल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या हे बॅनर निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ते काढण्यासाठी हालचाल केली. तसेच याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शहरातील तणाव टळला आहे. शहरात “आय लव मोहम्मद” हे बॅनर कुणी लावले? त्यांचा नेमका उद्देश काय होता? याचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.