Chhatrapati Sambhajinagar kidnapping 
Video

Crime : संभाजीनगरात खळबळ, बिल्डरच्या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण, २ कोटींची मागणी| VIDEO

Crime News : वडिलासोबत सायकल खेळत होता. वडील हे वॉकिंग करीत असताना तो काहीसा मागे राहिला. तेवढ्यात एक कार आली अन् पोराला घेऊन गेली. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

Namdeo Kumbhar

Chhatrapati Sambhajinagar kidnapping Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात एका बिल्डरच्या ७ वर्षीय मुलाचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजता एन ४, सिडको भागात घडली. धक्कादायक म्हणजे, खंडणीसाठी आलेला अपहरणकर्त्यांचा मोबाइल काही वेळाने बंद झाला. त्यानंतर सर्वजण चिंताग्रस्त झाले आहे. दरम्यान, अख्खे शहर पोलीस दल मुलाला शोधण्यासाठी रस्त्यावर उतरले. चौकाचौकात नाकाबंदी लावण्यात आली होती.

चैतन्य असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तुपे हे नामांकित बिल्डर आहेत. मंगळवारी रात्री चैतन्य हा वडिलासोबत सायकल खेळत होता. वडील हे वॉकिंग करीत असताना तो काहीसा मागे राहिला. तेवढ्यात एक कार आली. कारच्या आतील आणि बाहेरील लाईट बंद होत्या. त्यांनी मुलाला जवळ बोलावले. तेवढ्यात मुलगा कारमध्ये जाऊन बसला. त्यानंतर कार उच्च न्यायालयाच्या दिशेने पसार झाली. काही क्षणात हा प्रकार वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी धावाधाव केली मात्र, काहीही उपयोग झाला नाही. पोलिसांना हा प्रकार समजताच त्यांनी तांत्रिक तपास सुरु केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जुलाब होतायेत? मग दहीसोबत मिसळून खा 'हा' १ पदार्थ

Chronic stress effects: सतत तणाव घेण्याची सवय मेंदू आणि शरीरासाठी का ठरते धोकादायक? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : महिलेने यात्रेतून खरेदी केली चादर; घरी जाऊन घडी उलगडताच पायाखालची जमीन सरकली, पाहा नक्की काय घडलं?

Pune : पुण्यात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा सापडला ACB च्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT