Chhatrapatil Sambhajinagar BJP 16 corporator News Saam TV
Video

VIDEO : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार; छत्रपती संभाजीनगरमधील १६ नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार!

Satish Daud

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल १६ नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. येत्या ७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हे नगरसेवक शिवबंधन बांधणार असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते राजू शिंदे हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असून संजय शिरसाठ हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे राजू शिंदे हे आता थेट ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय.

राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद आहे. त्याचबरोबर भाजपच्या काही नगरसेवकांवर देखील त्यांची चांगलीच पकड आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही शिंदे गटाला चांगली मदत करूनही त्यांनी आमचे आभार मानले नाहीत. उलट महायुतीत आम्हीच मोठा भाऊ असल्याचं ते आम्हाला हिणवत असल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलंय.

तुम्हाला जर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेसोबत काम करायचं असल्यास आम्ही भाजपमधून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून जनतेचे काम करू असंही राजू शिंदे यांनी ठामपणे सांगितलं आहे. आमच्यासोबत भाजपचे बहुतांश कार्यकर्ते देखील असल्याचा दावा राजू शिंदे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले राजू शिंदे पाहा संपूर्ण व्हिडीओ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Marathi News Live Updates : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT