Chhagan Bhujbal SaamTv
Video

Chhagan Bhujbal : भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मोठी अपडेट आली समोर | VIDEO

OBC Leader Chhagan Bhujbal News : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवार गटाचे आमदार आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ हे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर आज भुजबळ मुंबईत दाखल झाले असून पुढील दोन दिवस ते मुंबईत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. या दोन दिवसात ते देशभरातील ओबीसी समाजाच्या नेत्याना भेटणार आहेत.

महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वीच झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळालं आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जुन्या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्याचं बघायला मिळालं. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. त्यानंतर छानग भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली आहे. तसंच अजित पवार यांची साथ सोडण्याबद्दलचे अनेक सूचक वक्तव्य देखील याकाळात भुजबळ यांनी केले. त्यामुळे ते काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच आता भुजबळ हे पुढील 2 ते 3 दिवसांसाठी मुंबईत असून या काळात ते सर्व ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी सर्व ओबीसी नेते देखील आता मुंबईत दाखल झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भेटीगाठीत भुजबळ सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून आपली पुढील भूमिका ठरवणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या तरी छगन भुजबळ यांनी या सर्व प्रकरणावर प्रसिद्धीमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT