Chhagan Bhujbal SaamTv
Video

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळांचा मोठा खुलासा; म्हणाले.. |VIDEO

Chhagan Bhujbal Press Conference : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साधारण अर्ध तास त्यांच्यात चर्चा झाली.

Saam Tv

मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सामाजिक व राजकीय आदी अनेक मुद्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. ओबीसींच्या पाठबळामुळेच महायुतीचा महाविजय झाल्याचंही त्यांनी यावेळी मान्य केलं असल्याचं छगन भुजबळांनी म्हंटलं आहे. सोमवारी त्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसींचे नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आहेत. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबद्दल त्यांनी अनेकवेळा सूचक वक्तव्य देखील केले आहेत. त्यानंतर आज त्यांनी अचानक सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दोघांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी पुढील मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 8-10 दिवसांचा वेळ मागितला असून आम्ही पुन्हा भेटून ओबीसींच्या मुद्यावर साधक - बाधक विचार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असं भुजबळ यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT