माधव सावरगावे, साम टीव्ही
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांची आणि नातेवाईकांची ही उपचारासाठी गर्दी आणि दुसरीकडे उद्घाटन झाल्यापासूनच बंद असलेले हे किमोथेरपी सेंटर. फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठ्या गाजावाजात लोकार्पण झालेल्या डे केअर किमोथेरपी सेंटरची अवस्था सध्या कुलूपबंद होते. सहा महिने उलटूनही येथे एकाही कॅन्सर रुग्णाला किमोथेरपी सेवा मिळालेली नाही. इतकंच नाही तर उपचाराची साधने साहित्य धूळखात पडून होते. हा प्रकार साम टीव्हीने समोर आणल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ९ फेब्रुवारी २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील 'डे केअर किमोथेरपी सेंटर'चे ऑनलाइन उद्घाटन झाले होते. प्रत्यक्षात ते आतापर्यंत बंद अवस्थेत होते, सहा महिने उलटूनही येथे एकाही कॅन्सर रुग्णाला किमोथेरपी सेवा मिळालेली नाही.
दहा खाटांचे हे विशेष किमोथेरपी सेंटर आहे, जिथे दररोज किमान दहा कर्करोग रुग्णांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था जाहीर करण्यात आली होती.
हे सेंटर चालवण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस नियुक्त करण्यात आले नाहीत. किमोथेरपीसाठी लागणारी औषधे उपलब्ध झाली नाहीत.
सेवाच न मिळाल्याने अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांचा मार्ग धरावा लागत. त्यासाठी मोठ्या आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागत असून, अनेक रुग्ण उपचाराअभावी जीव गमावत आहेत. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावरील उपचारासाठी वेळ अत्यंत महत्वाचा असतो. अशावेळी सुविधा असूनही ती रुग्णांच्या सेवेत न आणणे, हा गंभीर अनास्थेचा प्रकार आहे. ही बातमी साम टीव्हीने दाखवताच प्रशासनाने तातडीने पाऊल टाकले. या रुग्णालयात पाच कर्मचारी, औषध आणि रुग्णांसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.