Firefighters trying to control the blaze after a chemical tanker caught fire on Thane-Ghodbunder Road; traffic disrupted for hours. Saam Tv
Video

Thane Fire: ठाण्यात केमिकल टँकरला भीषण आग; हवेत पसरले धुरांचे लोट, VIDEO

Chemical Tanker Catches Fire In Thane: ठाण्यातील घोडबंदर रोडवर केमिकल टँकरला अचानक आग लागली. ज्वलनशील रसायनामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती.

Omkar Sonawane

ठाण्याहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याने आग पसरल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. या घटनेमुळे पुढील चार ते पाच तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता होती, मात्र आग आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या या भागातील वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. ठाणे-घोडबंदर मार्गावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात नशिबाची साथ कोणाला? तुमच्या राशीनुसार जाणून घ्या यश-अपयशाचे संकेत

Maharashtra News Live Update:मला डॉक्टर व्हायचं होतं, पण... - मंत्री पंकजा मुंडे

Mumbai Crime: पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, भररस्त्यात चाकूने वार करत तरुणाला संपवलं; मुंबई हादरली

Maharashtra Politics : महाराष्ट्राला मिळाले १० नवे आमदार, सर्व यादी एका क्लिकवर

नसरापूर प्रकरणावरून संतापाचा आगडोंब; विकृताच्या कृत्याने प्रवीण तरडे भडकले, पोलिसांकडे केली मोठी मागणी

SCROLL FOR NEXT