Commuters stranded in massive Chembur traffic jam during Maratha reservation protest. Saam Tv
Video

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनामुळे भीषण वाहतूक कोंडी; चेंबूरमध्ये रस्त्यावर तब्बल ५ हजार वाहनं अडकली, VIDEO

Massive Traffic Jam in Chembur: चेंबूरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनामुळे तब्बल तीन तास वाहतूक कोंडी झाली असून ५ हजारांहून अधिक वाहनं अडकून पडली आहेत.

Omkar Sonawane

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे चेंबूर परिसरात तब्बल तीन तासांपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीत मराठा बांधवांसह सर्वसामान्य प्रवासी अक्षरशः अडकून पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच हजारांहून अधिक गाड्या चेंबूर परिसरात थांबून पडल्या असून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासूनच सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीचा फटका कार्यालयीन वेळेतील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी वाहनांची संख्या प्रचंड असल्याने कोंडी कमी होताना दिसत नाही. मराठा बांधवांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात वातावरण तापले असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला 'लाडकी'चा लाभ, सरकार प्रत्येकी ₹२१००० परत घेणार

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

SCROLL FOR NEXT