Maharashtra Election  Saamtv
Video

Mayor Election : भाजपची ठाकरेसेनाला महापौरपदाची ऑफर, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

Maharashtra municipal election updates : चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी नवे समीकरण तयार होत आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही, भाजपने ठाकरे गटाच्या शिवसेनेला थेट महापौरपदाची ऑफर देत मोठी राजकीय खेळी केली आहे.

Namdeo Kumbhar

Chandrapur Municipal Politics : राज्यात नुकत्याच २९ महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. सत्ताधारी भाजपला या महापालिकांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. तर काँग्रेसनेही अनेक ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवलेय. चंद्रपूर महापालिकेत आता वेगळेच गणित रंगलेय. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर भाजप दुसऱ्या जागांवर आहे. पण या दोघांना सत्तास्थापनेसाठी तिसऱ्याच पक्षाची मदत लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला थेट महापौरपदाची ऑफऱ दिली आहे. चंद्रपूरमधील या नव्या समीकऱणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भविष्यात याला मोठं स्वरूप येणार का? अशी चर्चा चंद्रपूरमध्ये सुरू आहे. (Maharashtra municipal politics latest update Chandrapur)

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेचा पेच सुटण्याऐवजी अधिकच रंगतदार झालाय.... 27 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, सत्तेचे समीकरण बदलण्यासाठी भाजपनं मोठी खेळी खेळलीय.... सूत्रांच्या माहितीनुसार, 23 जागा असलेल्या भाजपनं केवळ 6 जागा जिंकलेल्या ठाकरेसेनेला थेट 'महापौरपदाची' ऑफर दिलीय.... महायुतीच्या नेत्यांच्या इशाऱ्यावरून या हालचाली सुरू असून, या प्रस्तावामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

Couple Ring Designs: गर्लफ्रेंडसाठी अंगठी खरेदी करताय? या आहेत 5 ट्रेंडिग डिझाईन्स

ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Live News Update: कंपनीतील सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

Hair Care: पांढरे केस वाढल्यामुळे सतत केस डाई करायची सवय लागली आहे? मग होऊ शकतो 'हा' परिणाम

SCROLL FOR NEXT