Chandrakant Patil gives chocolate to uddhav Thackeray at Vidhan Bhavan watch Video  
Video

VIDEO : भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी दिलं उद्धव ठाकरेंना चॉकलेट; भेटीमुळं चर्चेला उधाण!

Chandrakant Patil Meets Uddhav Thackeray Video : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.

Nandkumar Joshi

भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब आणि अंबादास दानवे हे नेते देखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट दिलं. तर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छाही दिल्या. तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर उद्या तुम्ही चॉकलेट देणारच आहात, असं उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले असतानाच, पाटील आणि ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT