Hindi sakti Saam TV
Video

Hindi Sakti :त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून निर्णय जाहीर | VIDEO

Three-Language Policy : त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर झाली आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत ३ भाषा शिकणे गरजेचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून, "कोणत्या तीन भाषा शिकवायच्या, हा निर्णय संबंधित राज्य सरकारांचा असेल," असे केंद्राने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांनी तीन भाषा शिकणं अपेक्षित आहे. मात्र, कोणती भाषा शिकवायची याबाबत केंद्र सरकारने सक्ती न करता राज्यांना आणि शाळांना स्वातंत्र्य दिले आहे.

या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा भारतीय असाव्यात, अशी धोरणात्मक अपेक्षा केंद्राने व्यक्त केली आहे. इंग्रजी किंवा इतर परदेशी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवली जाऊ शकते. यामध्ये कोणत्याही भाषेची सक्ती नाही, आणि त्रिभाषा सूत्र हे शिफारसी स्वरूपात असून त्याची सक्ती पहिलीपासून नाही माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तीन भाषा शिकायच्यात, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यांच्या भाषिक धोरणाला केंद्राने आदर दिला असल्याचे यातून स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Offer: Jio चा सुपरहिट प्लॅन! स्वस्तात देतंय अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि हॉटस्टार Subscription

Jalna Tourism : जालना येथील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Gautami Patil : कातिल अदा अन् ग्लॅमरचा तडका; मार्केटमध्ये गौतमी पाटीलचं नवीन गाणं आलंय, पाहा VIDEO

EPFO New Rule: पीएफची २ महिन्याची 'ती' अट रद्द, EPFO ने घेतला मोठा निर्णय, नव्या नियमाचा तुम्हाला किती फायदा?

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT