Railway Saam TV
Video

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Central Railway Update : ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १० जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण यादीच्या वेळेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलै २०२५ पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.नवीन नियमानुसार, ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी प्राथमिक आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आपली प्रवास स्थिती आधीच कळू शकेल आणि तयारी करण्यासाठी वेळ मिळेल.

तसेच अंतिम यादी ट्रेन सुटण्याच्या अर्धा तास आधी तयार केली जाणार आहे. याआधी ही यादी साधारणत: ४ तास आधी प्रसिद्ध केली जायची. या निर्णयामुळे तिकीट प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना अधिक निश्चितता मिळणार आहे. या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि नियोजनबद्ध होणार आहे. तसंच, ऑनलाइन आणि तिकीट काउंटरवर आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेळेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT