Manasvi Choudhary
आरोग्यासाठी फायदेशीर 5 प्रकारच्या पौष्टिक लाडूंच्या रेसिपी तुम्हाला माहिती असणे महत्वाचे आहे.
पारंपरिक बेसन आणि साखरेच्या लाडूऐवजी भाजलेले बेसन, गूळ आणि यामध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलांच्या बिया व चिया सीड्स मिक्स करून लाडू बनवा. हे लाडू चवीला अप्रतिम लागतात आणि शरीराला भरपूर ऊर्जा देतात.
भाजलेले ओट्स आणि खमंग भाजलेले शेंगदाणे एकत्र करून हेल्दी लाडू तयार करा. ओट्सची जाडसर पावडर करून त्यात शेंगदाणे आणि गोडव्यासाठी खजूर मिक्स लाडू पचनासाठी हलके असतात.
नाचणी आणि गुळाच्या लाडूंमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर हे घटक भरपूर प्रमाणात असतात. नाचणीच्या पिठात गुळाची पूड, पौष्टिक सुकामेवा आणि तीळ मिसळून बनवलेले लाडू हाडांच्या बळकटीसाठी उत्तम मानले जातात.
ओला किंवा सुका किसलेला नारळ आणि जवस एकत्र करून बनवलेल्या लाडूंमध्ये ओमेगा-३ फॅट्स आणि फायबरचे गुणधर्म असतात. यामध्ये गोडव्यासाठी खजूर, गूळ आणि चवीसाठी वेलची किंवा दालचिनी पावडर मिक्स करा.
बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, खजूर आणि मनुका एकत्र वाटून हे लाडू बनवा. साखरेचा वापर न करता केवळ खजुराच्या गोडव्यावर तयार होणारे हे ड्रायफ्रुट्स लाडू आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहेत.