Manasvi Choudhary
रोझमेरी तेलाने टाळूची हलक्या हाताने मालिश केल्याने टाळूचे रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस दाट होण्यास मदत होते.
केस गळतीच्या समस्येवर भोपळ्याच्या बियांचे तेल अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. हे तेल टाळूला लावल्याने नवीन केस उगवण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांना मजबूती मिळते.
खोबरेल तेल पारंपारिक तेलापैकी एक आहे. केसांना खोबरेल तेल लावल्याने केसांना आतून खोलवर पोषण मिळते. प्रदूषण आणि विविध हेअर स्टाईलिंगमुळे खराब झालेले केस सुधारण्यास खोबरेल तेल फायदेशीर आहे.
दाट आणि लांब केसांसाठी एरंडेल तेल अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हे तेल थोडे घट्ट असल्यामुळेखोबरेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून वापरावे. नियमित वापराने केसगळती कमी होते.
व्हिटॅमिन 'ई'ने समृद्ध असलेले बदाम तेल केसांना लावल्यास केस मऊ, आणि सुटसुटीत होतात. केसांचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
भृंगराज तेल हे आयुर्वेदातील सर्वात उत्तम औषधी तेल मानले जाते. केसांची मुळे बळकट करण्यासाठी, अकाली पांढरे होणारे केस रोखण्यासाठी भृंगराज तेल फायदेशीर मानले जाते.
आर्गन तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. हे तेल केसांना लावल्याने केसांमधील कोरडेपणा व फ्रिझीनेस कमी होतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते.