LPG Gas Cylinder  Saam tv
Video

केंद्र सरकारचा एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा निर्णय, हॉटेल व्यावसायिकांना होणार फायदा, वाचा काय घेतला निर्णय?

Commercial LPG price today : केंद्र सरकारने व्यावसायिक आणि औद्योगिक एलपीजी ग्राहकांवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून बल्क एलपीजी पुरवठाही ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक आणि औद्योगिक (Industrial & Commercial) एलपीजी ग्राहकांवर असलेले सर्व निर्बंध आता पूर्णपणे हटवले आहेत.

पश्चिम आशियातील (West Asia) संकटामुळे गॅस पुरवठ्यावर जे परिणाम झाले होते, ते आता सुधारले असून पुरवठा पूर्वीच्या पातळीवर आणण्यात आला आहे. बल्क एलपीजी (Bulk LPG) पुरवठा वाढवून तो आता थेट ५० टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) या संदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे हॉटेल मालक, रेस्टॉरंट्स आणि मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या गॅसचा तुटवडा दूर होईल आणि उद्योग क्षेत्राला खूप मोठी मदत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT