Nagpur Stone Throwing CCTV 
Video

Nagpur Video : औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात राडा, जमावाने केलेल्या दगडफेकीचा CCTV

Nagpur Stone Throwing CCTV : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर पेटले. महाल परिसरात दोन गटात जोरदार राडा झाला. याचा व्हिडीओ समोर आलाय. जमावातील काही समाजकंटकांनी पोलिसांवरही हल्ला चढवला.

Namdeo Kumbhar

Nagpur violence Video : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापलेय. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत सोमवारी राज्यभरात जोरदार आंदोलन (Nagpur violence updates) करण्यात आले. या आंदोलनादरम्यान नागपूरच्या महाल भागात दोन गटात जोरदार राडा झाला. दोन्ही समुदायातील गट घोषणाबाजी करत एकमेकांना भिडले. संतप्त जमावाने दगडफेक केली, याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नागपूरमधील काही भागात जमावाकडून जोरदार घोषणाबाजी आणि राडा झाला. काही समाजकंटकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करत वाहनांची जाळपोळ केली. या दगडफेकीत १५ पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारासह अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. सोमवारी रात्री पोलिसांनी कोम्बिंक ऑपरेशन करत ५० जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सुत्रधारांचा शोध घेतला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT