Bengaluru pet dispute Saam tv
Video

बोक्यानं साधला मोका अन् मांजरी संग भिडवला टाका, पिल्लांच्या मालकीवरून राडा, पाहा नेमकं झालं काय?

Bengaluru viral news today : बेंगळुरूमध्ये मांजर आणि बोक्याच्या प्रेमप्रकरणामुळे दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. पिल्लांच्या मालकीवरून भांडण इतके वाढले की पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. वाचा ही अनोखी घटना.

Namdeo Kumbhar

आता बातमी आहे, मांजर आणि बोक्याच्या प्रेमाची...मांजर आणि बोक्याच्या प्रेमप्रकरणामुळे दोन शेजारी एकमेंकांसोबत भिडलेत... हा राडा नेमका का झाला?

बेंगळुरुमध्ये मांजर आणि बोक्याच्या प्रेम प्रकरणात काय-काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

मांजर-बोक्याचं प्रेम

शेजाऱ्यामध्ये राडा

बोक्यानं साधला मोका अन् मांजरी संग भिडवला टाका

दोघांचा झाला रोमान्स.. अन् चर्चेला मिळाला जोरदार चान्स

घटना बेंगलोरच्या शेशाद्रीपुरमची..

बोकोबा गल्लीत ऐटीत फिरायचा...

अन् मांजरीकडं एकटक बघायचा...

दिसायची छान मांजरराणी...मग् सुरु झाली प्रेमकहाणी...

दोघांमधी रंगला रोमान्सचा बाण...अन् पिल्ल झाली चार छान...

मांजरीची मालकीन भलतीच संतापली... पिल्लं कुणाची? जोरादार म्हणाली... मांजर म्याव गपचूप बसली.. पिल्लं उचलून बोक्याच्या दारात मांडली...

पिल्ल दारात दिसताच बोक्याच्या मालकीनीचा पाराच चढला... अन् मांजरीनीच्या मालकीसंगच भिडल्या.. एसिड हल्ल्याच्या दिल्या धमक्या... प्रकरण झालं जामच गंभीर पोलीस आलं एकदम खंबीर... चर्चा झाल्या बैठका झाल्या दोन - दोन पिल्लं वाटून घेतली...

शेवटी काय पाळीव प्राणी ती पाळीव प्राणी... त्यांना कसली आली बंधन... शेजाऱ्यांनी मात्र गुण्यागोविंदा शेजार धर्म पाळणं

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही

-----------

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT