money bag found at Kharghar sector 20 ahead of navi mumbai municipal elections voting  saam tv
Video

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

Municipal election Voting Updates : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच, खारघरमध्ये पैशांनी भरलेली बॅग सापडल्यानं खळबळ उडाली आहे. बॅगमधील पाकिटांत ५०० च्या नोटा सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या बॅगसोबत उमेदवार किंवा पक्षाचे प्रचार पत्रक नव्हते.

Nandkumar Joshi

विकास मिरगणे, खारघर, साम टीव्ही

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव! याच लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचं काम सध्याच्या महापालिका निवडणुकांमध्ये सुरू आहे. मतदारांना खेचून आणण्यासाठी अक्षरशः जिकडं-तिकडं पैशाचा पाऊस पाडला जात असल्याचं चित्र आहे. मुंबईसह आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रांत अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार घडलेत. काही ठिकाणी उमेदवारांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून केला जात आहे. मारहाणीच्या घटना घडत आहेत. आता नवी मुंबईच्या खारघर परिसरात पैशानं भरलेली बॅग आढळली आहे. सेक्टर २० मध्ये ही बॅग सापडलीय. निवडणूक मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हा प्रकार उघड झालाय. या बॅगमधून आणलेले पैसे मतदारांना देण्यासाठी असल्याचा संशय आहे. धक्कादायक म्हणजे हे पैसे पाकीटांमध्ये भरलेले आहेत. या प्रकरणात खारघर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बॅगमधून पाकीटांमध्ये आणलेले पैसे कोणत्या पक्षाचे, कोणत्या उमेदवाराचे याबाबत अद्याप काही ठोस माहिती कळू शकलेली नाही. त्यामुळेच पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅगमध्ये पाचशे-पाचशेच्या नोटा पाकीटात भरलेल्या सापडल्या असल्या तरी, कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रचार पत्रक किंवा इतर कागदपत्रे सापडलेली नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीएमसीतही लाडक्याच किंगमेकर ठरणार? लाडकीच्या हाती, पालिकेची चावी?

ऐन निवडणुकीत राज्यात पैशांचा पाऊस; निवडणूक अधिकाऱ्यांनी २ दिवसांत ९०००००० रुपयांची रोकड पकडली

होय मी बाजीरावच, फडणवीसांची टीका, दादांचं प्रत्युत्तर

Maharashtra Live News Update: जास्तीत जास्त मतदान करावं; एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्यांनो सावधान! आई-वडिलांकडे पाठ, पगारात कपात

SCROLL FOR NEXT