रविवारी संभाजी राजे छत्रपती हजारो शिवभक्तांसह विशाळगडावर पोहोचले होते. यादरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्यात आलं . या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळालं होतं. तर आता विशाळगड परिसरामध्ये तोडफोडप्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकारची १० पेक्षा अधिक कलमांमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितानादेखील पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.