Uddhav Thackeray saam tv
Video

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार?

BJP Leader statement on Operation tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे. शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी होणार असल्याचं सूचक वक्तव्यही या नेत्यानं केलंय.

Nandkumar Joshi

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांचा धुरळा उडालाय. सर्वच पक्षांनी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. ही रणधुमाळी सुरू असतानाच ऑपरेशन टायगरचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या ऑपरेशन टायगरबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं या शक्यतांना अधिक बळ मिळालं आहे.

योग्य वेळी ऑपरेशन टायगर यशस्वी होणार असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंचे सात खासदार फुटीच्या तयारीत असून दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची चर्चा होत आहे.

ऑपरेशन टायगर योग्य क्षणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे हे तर अचूक नेम घेणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा अचूक नेम लागेल, याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही, असेही मुनगंटीवार ठामपणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney health: किडनीच्या आजाराने त्रस्त आहात? मग या 5 पदार्थांपासून राहा चार हात लांब

Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? मुंबईतील बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात भूकंप; 'इतके' आमदार शिंदेंसेनेच्या वाटेवर

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये पावसाने दडी मारल्याने सोयाबीन मातीमोल

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत बेस्ट बस आणि मेट्रोने रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास, वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT