Minister Makarand Patil during the heated cabinet meeting on farmers’ aid distribution in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Cabinet Meeting Controversy: शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळात खडाजंगी|VIDEO

Minister Makarand Patil Alleges Relief Didn’t Reach Farmers: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा वाद झाला. मंत्री मकरंद पाटील यांनी मदत पोहोचली नसल्याचा आरोप केला तर प्रशासनाने मदत पोहोचल्याचा दावा केला.

Omkar Sonawane

शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला.

दरम्यान, प्रशासनाने मात्र सर्व मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. या दोन्ही बाजूंच्या दाव्यानंतर बैठकीत वातावरण तापले आणि मंत्र्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी आजच मदतीचा सविस्तर आढावा घेऊन, नेमकी किती आणि कोणत्या भागात मदत पोहोचली याची माहिती सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकाऱ्यांच्या बांदावर जाऊन नुकसानीची पाहणी देखील केली होती. त्यांनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यावधीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही असा दावा मंत्री मकरंद पाटील यांनी केला. मात्र हा आरोप खोडून काढत मदत पोहोचल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Imtiaz Jaleel Attack: इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झाला तो क्षण, पाहा VIDEO

Pneumonia Care: थंडीत फ्लू आणि न्यूमोनियाच्या आजारात वाढ, कशी घ्याल काळजी? डॉक्टरांनी दिल्या ५ अत्यावश्यक टिप्स

Cervical cancer: महिलांच्या शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर सर्वायकल कॅन्सरचा धोका अधिक; संकेत दिसताच करून घ्या टेस्ट

Maharashtra Live News Update: संजय राऊत म्हणजे महाराष्ट्रातील मनोरुग्ण, विजय चौधरी यांची जहरी टीका

PunjabI Samosa: कुरकुरीत पंजाबी समोसा कसा बनवायचा? सोपी रेसिपी लगेच करा ट्राय

SCROLL FOR NEXT