CCTV footage from Lasalgaon jewelry shop shows burqa-clad woman suspected of stealing a gold ring. Saam Tv
Video

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Burqa Clad Woman Steals Gold Ring From Jewelry Shop: नाशिकच्या लासलगाव येथे बुरखाधारी महिलेकडून नामांकित ज्वेलरी दुकानात चोरीची घटना घडली आहे. सोन्याची अंगठी बदलून नकली अंगठी ठेवत हातचलाखीने चोरी करण्यात आली.

Omkar Sonawane

नाशिकच्या लासलगाव येथील शिवाजी चौकातील एका नामांकित ज्वेलरी दुकानात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. बुरखाधारी महिला आणि तिच्या साथीदाराने हातचलाखीने सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बदलून तिच्या जागी नकली अंगठी ठेवत दुकानातून पोबारा केला. या प्रकरणी संबंधित ज्वेलरी दुकान मालकाने लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरू असून लासलगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

Shocking: हृदयद्रावक! गरोदर बायकोच्या मृ्त्यूनंतर काही तासांत नवऱ्याने सोडले प्राण, एकाच ठिकाणी दोघांवर अंत्यसंस्कार; नेमकं घडलं काय?

Jaggery Benefits: हिवाळ्यात गूळ खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Shweta Tiwari Photos: लाल चोळी अन् पिवळी साडी, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून तरूणाई झाली घायाळ

Maharashtra Live News Update: मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदावरीची आरती

SCROLL FOR NEXT