बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. टँकरच्या मदतीने बुलढाणा जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्याची वेळ ओढावलीय. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील ४६ गावांना ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. मागील ४ वर्षातील टँकरग्रस्त गावांची ही सद्यस्थितील सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधल्या काळात जिल्ह्यात दुपटीने टँकरची संख्या वाढली होती. ही परिस्थिती पहाता मे अखेर जिल्ह्यात ८२ च्या आसपास गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जातोय. पणी टंचाईच्या दृष्टीने आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या गंभीर बनलीय. ३६ गावांसाठी २६८ विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत. एकट्या देऊळगाव राजात २८ गावांसाठी तब्बल ५२ विहीर आधार बनल्या आहेत, तर मेहकर तालुक्यात ४६ गावांसाठी ४७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.