Sharad Pawar Praful Patel News AI Image
Video

Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

NCP Sharad Pawar Health Update News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीची राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि प्रफुल्ल पटेल यांनी विचारपूस केली.

Alisha Khedekar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली.

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही शरद पवार यांना फोन केला. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीदेखील फोन करून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत आणि प्रकृतीबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना मिळणार हक्काची घरे

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ; नेतन्याहूंची सत्ता धोक्यात!

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

SCROLL FOR NEXT