Brain Eating amoeba SAAM TV
Video

Brain Eating amoeba : सावधान! देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा पुन्हा उद्रेक, केरळमध्ये १९ जणांचा मृत्यू | VIDEO

Kerala Health Alert : आता सर्वांची चिंता वाढवणारी बातमी आहे. देशात मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होणाऱ्या आजाराचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून, ६५ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात पुन्हा एकदा मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होणाऱ्या आजाराचा उद्रेक झाल्याने चिंता वाढली आहे. केरळमध्ये या आजारामुळे तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला असून ६५ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.सरासरी चार ते पाच दिवसांनी ताप, जुलाब, डोकेदुखी आणि अंगदुखी ही लक्षणे दिसतात असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. आरोग्य विभागानं नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हा अमिबा सामान्यतः पाण्यातून शरीरात प्रवेश करतो. विशेषतः पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींच्या नाकावाटे तो शरीरात शिरतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे रुग्णांची प्रकृती झपाट्याने बिघडते आणि मृत्यूचा धोका वाढतो.डॉक्टरांनी नागरिकांना असुरक्षित व अस्वच्छ पाण्यात पोहणे टाळावे, शंका आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT