Police and bomb squad teams inspect Rahul International School premises after receiving a bomb threat via email in Nalasopara’s Shriprastha area. saam tv
Video

Bomb Threat: नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी;|VIDEO

Security Alert in Nalasopara: नालासोपाऱ्यातील श्रीपस्था परिसरातील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

पालघर जिल्हयातील नालासोपाऱ्यातील श्रीपस्थान परिसरात आज सकाळी मोठी खळबळ उडाली. येथील राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि मदर मेरी ज्युनिअर कॉलेज या दोन शाळांना अज्ञात व्यक्तीकडून बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. सकाळी ४ वाजून २६ मिनिटांनी शाळेच्या अधिकृत ईमेलवर ही धमकी आली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन, तसेच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले असून, शाळा इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सध्या बॉम्ब शोध पथक शाळेच्या परिसराची कसून तपासणी करत आहे.

पोलिसांकडून याबाबत अधिक तपशील घेण्याचे प्रयत्न सुरू असून, हा मेल कुठून आला, याचा तपास सायबर विभाग करत आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT