iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Dhanshri Shintre

ड्रॉपिंग इव्हेंटची घोषणा

ॲपलने ९ सप्टेंबरला होणाऱ्या अवे ड्रॉपिंग इव्हेंटची घोषणा केली आहे. या विशेष कार्यक्रमात कंपनी बहुप्रतिक्षित आयफोन १७ सीरीजचे अनावरण करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

चार नवे मॉडेल्स

या इव्हेंटमध्ये ॲपल चार नवे मॉडेल्स सादर करू शकते. आयफोन १७, १७ एअर, १७ प्रो आणि १७ प्रो मॅक्स.

किंमत आणि फीचर्स

आयफोन १७ सीरीजचे लाँचिंग होण्यापूर्वीच किंमत आणि फीचर्सची माहिती लीक झाली असून, तपशील आता चर्चेत आले आहेत.

सुरुवातीची किंमत

रिपोर्टनुसार, आयफोन १७ सीरीजची सुरुवातीची किंमत ८९,९०० रुपये असू शकते, तर आयफोन १७ एअर व्हेरिएंटसाठी अंदाजे ९५ हजार रुपये आकारले जाऊ शकतात.

आयफोन १७ प्रो मॅक्स

आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत सुमारे १,६४,९०० रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनी ही सिरीज आयफोन १६ पेक्षा अधिक किमतीत सादर करू शकते.

प्रोसेसर

आयफोन १७ सीरीजमध्ये कंपनी A19 प्रोसेसर देण्याची शक्यता आहे. या हँडसेटमध्ये USB-C पोर्ट, प्रोमोशन डिस्प्ले आणि ६.६-इंचाची स्क्रीन उपलब्ध असेल.

बॅटरी

आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये कंपनी ५००० एमएएच बॅटरी देऊ शकते. याआधी आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये ४६७६ एमएएच क्षमतेची बॅटरी उपलब्ध होती.

आयफोन १७ ची किंमत

जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार, आयफोन १७ ची किंमत ७९९ डॉलर्स ठरवली जाऊ शकते. म्हणजेच, हा फोन आयफोन १६च्या समान दरात उपलब्ध होईल.

सिंगल कॅमेरा

ॲपल यावेळी आपला सर्वात स्लिम मॉडेल आयफोन १७ एअर सादर करणार आहे. या व्हेरिएंटमध्ये ब्रँड ४८ मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा देऊ शकतो.

NEXT: आयफोन १६ प्रोच्या किंमतीत मोठी सूट; यूजर्ससाठी सुवर्णसंधी, आताच खरेदी करा

येथे क्लिक करा